अठ्ठावीस दिवसांचा यशस्वी लढा : 80 वर्षांच्या आजी कोरोना मुक्‍त!

Foto
जगण्याची प्रचंड उमेद, आत्मविश्वास आणि कुटुंबाची साथ या जोरावर 80 वर्षाच्या आजीने तब्बल 28 दिवस कोरोनाशी लढत देत त्याचा पराभव केलाच. महामारीच्या या संकटात अशी प्रेरणादायी घटना आज घडली. सरोज दत्तात्रय काजवे असे या आजींचे नाव.
श्रेयनगरात राहणार्‍या सरोज काजवे यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यानंतर कुटूंबाने तातडीने कोरूना टेस्ट  केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. आजीची वय तब्बल 80 वर्षांचे ! त्यामुळे कुटुंबीय चिंताक्रांत होते. अशाही परिस्थितीत आजींच्या चेहर्‍यावर चिंतेचा लवलेशही नव्हता. ईश्वर माझ्या पाठीशी आहे, असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले. दवाखान्यात दाखल होत कोरोनाशी लढाई सुरू झाली. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रूग्ण सापडत होते. याचा मानसिक परिणामही कुटुंबावर झाला. आजी मात्र डगमगल्या नाहीत. तब्येटीमधीलल चढ-उतार कुटुंबियांची झोप उडवीत होता. मात्र कणखर इच्छाशक्ती आणि जगण्याचा दुर्दम्य आशावाद यामुळे आजींनी तब्बल 28 दिवस कोरोनाशी निकराची लढाई केली. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर औषधी, प्राणायाम यासह सकारात्मक वृत्ती ठेवत अखेर कोरोनावर विजय मिळविलाच.

उत्साहात केले स्वागत
कोरोना मुक्त झालेल्या आजींचे नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. यावेळी श्रेयनगर उत्कर्ष मंडळाचे डॉ. कांतीलाल व्यास, तर क्रांतीचौक वार्डाच्या वतीने सागर वाडकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्रेयनगर उत्कर्ष मंडळ परिवारातील सदस्य वसंत आडगांवकर, मोहन खरवडकर, उमेश देशपांडे, प्रितेश बोरा, संजय तांबे,  सुनील खरवडकर, स्मिता खरवडकर, स्वाती फलटणकर, मंजिरी  खरवडकर, सुनयना खरवडकर आदीसह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker